21 Sept 2026, 05:30 UTC157 views8 reactionsread 3 October 2026 विद्रोह
मी नास्तिक,
तो आस्तिक.
मी निळ्या विचारांची तलवार,
तो गंजलेल्या साखळ्यांत अडकलेला.
मी प्रश्नांच्या वणव्यात पेटलेली झुंज,
तो शतकांच्या राखेत गाडलेली व्यथा.
मी कपाळावरच्या प्रश्नचिन्हाची जखम,
तो श्रद्धेच्या पट्टीने डोळे बांधलेला.
मी रूढींच्या छातीत घुसणारी धार,
तो परंपरेच्या लोखंडी पिंजऱ्यातला श्वास.
मी सावलीलाही प्रश्न विचारणारी,
तो सावलीलाच नतमस्तक.
मी निळ्या आकाशावर
विचारांची वीज कोरणारी,
तो बंद दरवाज…
❤4👍3😇1
Signed Karn
1 Aug 2026, 06:24 UTC413 views9 reactionsread 3 October 2026 Photo
एक एक शब्द तुझा मी
किती आठवावा...
या काजव्यांना
कैद करुनी,
अंधार भोवती
किती
साठवावा...
-K🌻
❤8🕊1
Signed Karn
10 Jul 2026, 16:19 UTC559 views11 reactionsread 3 October 2026 Photo
एक दिवस येईल
स्मृती डोळ्यात येतील
तुझ्या जाण्याची चाहूल
मला देऊन जातील...
बहुधा
वारा सुद्धा जोरात वाहेल...
मग ढग दाटून येतील...
मन किती तुटून जाईल...
सार किती बेरंग होईल...
सावरता सावरता मग
हा बांधही फुटून जाईल...
आणि
मग कदाचित
हसू ओठांवर असताना,
अश्रू डोळ्यात मारण्यासाठी
किती तो पाऊस येईल!!!
- Karn🌻
❤10🕊1
Signed Karn
7 Jun 2026, 13:38 UTC719 views10 reactionsread 3 October 2026 Photo
कुठे माझा लेखणीला
आता ती धार आहे?
जकडून बसला मला
कसला हा अंधार आहे?
- k🌻
❤6🕊3💔1
Signed Karn
5 Jun 2026, 09:02 UTC683 views16 reactionsread 3 October 2026 Photo
अंधाराच्या गडद रातीला
चांदण्याचे उपकार नको,
चमकेन काजव्यापरी पण
उपकाराचा भार नको...
🌻✨
❤13👌2😇1
Signed Karn
29 Apr 2026, 04:36 UTC728 views6 reactionsread 3 October 2026 Photo
मैं काफ़िर-ए-मोहब्बत हूँ, ये इल्ज़ाम किस पे करूँ, दिल-ए-बेक़रार का फ़साना, मैं किस महफ़िल में बयाँ करूँ।
तेरी निगाह-ए-नाज़ ने जो फ़तवा-ए-इश्क़ सुनाया था, उस हुक्म-ए-दिल के आगे अब, मैं किस क़ानून को सर करूँ।
हुस्न-ए-यार की तजल्लियों में, मैं खुद से ही गुम हो बैठी, आइना-ए-वजूद से पूछें, तो किस सूरत को मैं ज़ाहिर करूँ।
शब-ए-फ़िराक़ की तीरगी में, हर रौशनी बेनूर लगे, दिल-ए-सोज़ों की इस हालत को, किस शम् से में मुनव्वर क…
❤5😇1
Signed Karn
21 Apr 2026, 17:27 UTC680 views10 reactionsread 3 October 2026 गोड तुझ्या हसण्याला
मी एकटक पाहत रहावे.. × 2
अशी ही एक सांज
तुझ्या माझ्या मध्ये .....
अंधार हा मिटावा अन्
तू कवेत घ्यावे ..× 2
अशी ही एक किरण
तुझ्या माझ्या मध्ये .....
पहिल्या पहिल्या पावसात
आपण ही भेटावे
एकाच छत्रीत अर्ध अर्ध भिजावे....× 2
आणि संथ प्रेमधारा
तुझ्या माझ्या मध्ये.....
~S..
❤8🤗2
Signed Karn
2 Apr 2026, 02:49 UTC826 views6 reactionsread 3 October 2026 Photo
Photo, posted without a caption
❤4👌2
Signed Karn
2 Apr 2026, 02:49 UTC726 views7 reactionsread 3 October 2026 मनाच्या कोपऱ्यात जपलेले काही शब्द, आजही शांतपणे तुझी आठवण काढतात...
भावना तर खूप होत्या मनात,
पण त्या ओठांवर येण्याआधीच हरवून जातात.
तुझ्यासमोर उभी राहिले की,
हृदय हजार गोष्टी सांगू पाहायचं... पण, त्या एका क्षणी मात्र, माझं धैर्यच मला सोडून जायचं.
हो, मला ही भावना होत्या तुझ्यासाठी,
हे मन अनेकदा कबूल करतं...
पण, तुला सांगायच्या आधीच,
माझं मौन सगळं काही लपवून ठेवतं.
आजही वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत तुझीच आठवण हलक…
❤6👌1
Signed Karn
31 Mar 2026, 10:38 UTC730 views7 reactionsread 3 October 2026 Photo
सगळं सांगितलंस मला
तुझं नकोसं वाटणारं भीतीचं जग…
मी तेही शांतपणे ऐकलं
कारण तुझ्या भीतीतही मला तूच दिसलास…
तू साथ द्यायला तयार नाहीस
हेही मी समजून घेतलं
कारण कधी कधी भीती
माणसाला स्वतःपासूनही दूर नेत असते…
पण एक विचार मनात येतो
मी तुला समजून घेतलं
मग तू मला का नाही?
माझं मन इतकं तुझ्याकडे धावतंय
जसं कधीच कोणासाठी धावलं नव्हतं…
ही ओढ, ही तगमग
माझ्याही आवाक्याबाहेर गेलीय आता…
कदाचित मी मर्यादा ओलांडल्या असतील
कदाचित जास…
❤6😇1
Signed Karn
16 Feb 2026, 13:22 UTC951 views13 reactionsread 3 October 2026 Photo
मी नीट भावना
सांभाळू शकत नाही,
हे माझं अपयश आहे...
तुझ्यासमोर आले की
मी विस्कळीत होते
आणि
तरीही थांबत नाही...
मी शून्य असू शकते,
पण
तू कधीच नव्हतास...
तुझी किंमत
माझ्या शब्दांपेक्षा मोठी आहे...
मी स्वतःला तुझ्यापासून
वेगळं करू शकत नाही,
कारण तू सवय नाहीस
तू अस्तित्व आहेस...
माझ्या प्रत्येक कवितेत
एकच अर्थ उरतो
तू...
आणि शब्द
लेखणीपासून
कधीच सुटत नाहीत...
-p
❤11👍1😇1
Signed Karn
13 Feb 2026, 05:52 UTC914 views11 reactionsread 3 October 2026 Photo
आजचा दिवस सुद्धा
कालच्या सारखाच जाईल...
सखा सोबती सुद्धा
उद्या परका होईल...
एका क्षणात हे
सगळं घडून जाईल...
सारे जातील सोडून
अन् मग,
शेवटी मी एकटाच राहील...
- K
❤9🕊1😇1
Signed Karn
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @rahiilovemanjil. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.