1 Apr 2026, 18:16 UTC131 viewsread 9 August 2026 त्यांच्यातला एक पुढे आला...
त्याच्या चेहऱ्यावर तेच भयानक हसू होतं...
तो हळूच म्हणाला..
“आता तू आमच्यातलाच…”
त्याच्या गळ्यात जुनं तुटलेलं ताईत होतं…
त्यावर फिकट अक्षरं दिसत होती—
“वनरक्षक दल – १८६५”
आणि त्या क्षणी मला खात्री पटली…
मी त्या जंगलातून बाहेर आलोच नव्हतो...
कधी येणार ही नव्हतो..
जंगलाने मला गिळलं होतं...
आणि आता…
मीच त्या जंगलाचा भाग झालो होतो...
त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला—
"समीर… कुठे असेल?"
“समी…
Signed .........
1 Apr 2026, 18:16 UTC124 views1 reactionsread 9 August 2026 👹👹 *भयकथा* 👹👹
*रात्रीचे लग्न: जंगलाचा रस्ता*
सध्या लग्न सराई सुरू आहे.. रात्रीच्या लग्नावरून परतायला उशीरच होतो कधी कधी...
त्या रात्री आम्ही दोघं...
मी आणि समीर..
आमच्या मित्राच्या लग्नावरून परतत होतो...
लग्न बऱ्याच दूरच्या गावात होतं, परिसर पूर्ण अनोळखी… आणि वेळ झाली होती जवळपास रात्री सव्वा बारा...
“इकडेच थांबूया का?” मी विचारलं...
समीर हसला— “अरे स्वतःची कार आहे… तीन चार तासात पोहोचून जाऊ… म्हणजे दुपारी दुकान तर…
❤1
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC512 views4 reactionsread 9 August 2026 ऑफिसर ला सर्व संदर्भ लागला... ते दोघे त्यांनी केलेल्या नीच कर्माची शिक्षा आयुष्यभर भोगणार होते... फाशीच्या शिक्षे पेक्षा कितीतरी जास्त कठोर शिक्षा होती ती...
त्या दोन वेड्यांना हात पाय बांधून घेऊन गाडी मेंटल हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेली...
जिन्याच्या वरून शालिनी त्यांना घेऊन गेलेल्या दिशेकडे बघत होती... गाडीचा आवाज जसजसा कमी होत गेला.."आता मी मुक्त आहे..." एक आवाज घरात घूमला... त्या आवाजाबरोबर ती देखील अनंतात विरघ…
👍4
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC410 viewsread 9 August 2026 त्या रात्री अजून काहीच होणार नव्हते... पहाट होत आली होती.. जोशी काका उठले.. त्यांनी आश्लेषा ला घेऊन घर गाठले... अंघोळ आवरून दोघे जण लगेच पोलीस स्टेशन ला हजर झाले... तिथल्या ऑफिसर ला विश्वासात घेऊन सर्व घटना सांगितली आणि त्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली... ऑफिसर श्रद्धाळू होते... ते तातडीने खरे खोटे बघण्यासाठी काही स्टाफ घेवून आश्लेषा च्या घरी पोहोचले... शालिनी ने सांगितल्या प्रमाणे घराच्या मागेच एक चार पाच वर्ष…
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC284 views0 reactionsread 9 August 2026 "घाबरु नकोस ती तुला काहीही करू शकणार नाही.. तिला तुझ्या शी संवाद साधायचा आहे... येऊ दे तिला पुढे... तू निर्धाराने उभी रहा.. हे घर आता तुझे आहे.. हे जग तुझे आहे... तिचे आता इथे काहीच नाही... तिला तिच्या जगात जावे लागेल.." गुरुजींचा करडा आवाज आश्लेषा च्या कानात घुमला... तिला त्या आवाजाने धीर आला...
तिला स्पष्ट दिसले की ती स्त्री तिच्या अतिशय जवळ आहे.. खूपच जवळ...
तिच्या जवळ असण्याच्या जाणिवेने तिच्या अंगावर काटा उभा रा…
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC206 views0 reactionsread 9 August 2026 नलिनी काकू तो पर्यंत बाहेर येऊन त्यांच्या कडे बघत मिश्किल हसत उभ्या होत्या...
दोघे ही खूपच गोड स्वभावाचे जोडपे होते...
नलिनी काकू आश्लेषा ला मुलांची काहीही काळजी करू नकोस असे सांगून त्यांना आतमध्ये घेऊन गेल्या.. मुले आजी मिळाल्या सारखे त्यांच्या मागे धावत गेले.. दुपारी पर्यंत हाबकलेली आश्लेषा आता खूपच निवांत झाली होती..
"गुरुजी घरातील शुद्धीकरण विधी ला कधी सुरुवात करायची? तिने धाडस एकवटत गुरुजींना विचारले... .
"तू …
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC184 views3 reactionsread 9 August 2026 थोड्या वेळाने पावले परत दूर जाताना ऐकू आलीत.. परत एकदा जिना वाजू लागला... आणि एकदम सगळी कडे शांतता पसरली...
ती रात्र तशीच सरली... रात्र भर आश्लेषा चा डोळ्याला डोळा लागला नव्हता... पहाटे बाहेरील झाडांवरील पक्षांची किलबिल कानावर पडली तेव्हाच तिने पांघरून बाजूला केले होते... बाहेर चांगलेच उजडलेले होते त्यामुळे ती उठून बाहेर आली आणि एक नजर जिण्याकडे टाकली... काल दिवसापेक्षा आता तो डाग स्पष्ट दिसत होता... त्यात एक स्त्री…
❤2👍1
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC175 viewsread 9 August 2026 बघता बघता रात्र झाली... सर्व दरवाजांच्या आणि खिडक्यांच्या फळ्या व्यवस्थित बंद करून ती मुलांना घेऊन झोपण्याच्या खोलीत आली...
त्यांची त्या घरामधील पहिली रात्र होती..
त्या रात्री जेव्हा ते सर्व झोपले होते, तेव्हा एक भयंकर, रक्त गोठवणारी आर्त किंकाळी घरभर घुमली. आश्लेषा जागी झाली, तिचे हृदय जोरात धडधडत होते... तीने घाबरून मुले झोपलेल्या ठिकाणी नजर टाकली.. मुलांचे अंथरुन रिकामे होते... मुले खोलीमध्ये नसलेले बघून भीतीने ति…
Signed .........
4 Mar 2025, 02:47 UTC179 viewsread 9 August 2026 *अनामिक आत्मा: नवीन घरात दडलेले गूढ*
👹👹👹👹👹👹👹👹👹
*रुद्रदमन .* ✍️
आश्लेषा चा नवरा अचानक अपघाताने वारला... मागे दोन मुले आणि कर्ज सोडून गेला होता... अजून हि तिचे इतके काही वय झालेले नव्हते .. अवघ्या बत्तीस वर्षाची ती... दिसायला छानच म्हणावी लागेल.. अचानक नवऱ्याच्या जाण्याने ती आणि तिची मुले उघडी पडली होती... थोडी फार शेती होती आणि एक पडायला झालेले घर होते... आणि नवऱ्याने ठेवलेला कर्जाचा डोंगर... तिचे दूरचे एक दोन…
Signed .........
1 Mar 2025, 03:29 UTC298 views1 reactionsread 9 August 2026 भीतीचीही सवय होते
#कथाविश्व
( नारायण धारप यांच्या चेटकीण या कादंबरीत एक वाक्य आहे .. भीतीचीही सवय होते ..त्यावरून सुचलेली ही छोटी लघुकथा )
नटराजच्या दारातच विष्णू आम्हाला भेटला .महिन्यातून एकदा शेट्टीच्या नटराजला भेट द्यायची हा आमचा शिरस्ता.आम्ही आत घुसायला आणि विष्णू बाहेर पडायला एकच गाठ पडली.
"काय विष्णूभाऊ....!! झाली का .….."?? विक्रमने अंगठा ओठाजवळ नेऊन विचारले.
अर्थात त्याला पाहून विष्णूच्या कपाळावर आठ्या पडल्या…
👍1
Signed .........
24 Feb 2025, 16:51 UTC327 views2 reactionsread 9 August 2026 मध्ये काही सेकंद कसलाच आवाज येत नव्हता. हुश्श सुटलो म्हणत चिरागने डोळे उघडले आणि काही कळायच्या आत तो एखाद्या चुंबका प्रमाणे त्या ट्रेनकडे ओढला गेला. दोन डब्यांच्या मध्ये सापडून त्याच्या देहाच्या चिंधडया चिंधडया झाल्या. त्याची मरणप्राय किंचाळी मिथुन, गीरी आणि चेतनचे कान बधिर करून गेली. काहीच क्षणात आपल्या मित्राचं होत्याचं नव्हतं झालं हा धक्काच खूप मोठा होता त्यांच्यासाठी. तीघे जण तीथेच चक्कर येऊन पडले.
ट्रेनच्या दरव…
😱2
Signed .........
24 Feb 2025, 16:51 UTC282 views1 reactionsread 9 August 2026 अवस एक्सप्रेस...
प्लॅटफॉर्म क्रमांक दो के किनारे से दुर खडे रहिये, एक जलद गाडी जानेवाली है, कोई यात्री रेल्वे लाईन पार ना करे.....
रात्री दीडच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर अनाउंसमेन्ट होत होती. वास्तविक त्या वेळी प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यावरच काय प्लॅटफॉर्मसुद्धा कुणी नसतं. पण रुटीन जॉब म्हणून घोषणा सुरु होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दोन वेळा घोषणा देऊन झाल्या. काहीच वेळात एक ट्रेन धडधडत आली आणि पाठोपाठ एक कर्णकर्कश…
👍1
Signed .........
Showing the 12 most recent of 20 posts we hold for @Bhay123. View and reaction counts are the latest single reading for each post, not a live figure, and a recent post is still accumulating both. A view count marked ≈ was rounded by Telegram before we ever saw it — t.me prints views in full below 1,000 and to three significant figures above, so ≈1,200,000 means somewhere between 1,150,000 and 1,249,999. Unmarked counts are exact. Text is reproduced from the public post preview and truncated for length.